प्रतिनिधी – एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करणदादा पाटील, एरंडोल मा.नगरअध्यक्ष रमेश भाऊ परदेशी यांचे कट्टर समर्थक तसेच एरंडोल शहरातील लोकप्रिय नगरसेवक, माजी उपनगराध्यक्ष नितीन सदाशिव महाजन यांची शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली,यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेशदादा पाटील , भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर , पारोळा एरंडोल विधानसभा निवडणूक प्रमुख करणदादा पाटील, भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हाचिटणीस निलेश परदेशी, मा.नगरसेवक श्याम ठाकूर पिंटू राजपूत ज्ञानेश्वर कंखरे यांच्या उपस्थितीत नितीन सदाशिव महाजन यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या निवडी बाबत भारतीय जनता पार्टीचे नेते नामदार.ग्राम विकास मंत्री.गिरीश भाऊ महाजन यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगर अध्यक्ष रमेश भैय्या परदेशी जिल्हा कार्यकारणीचे सुनील भैया पाटील माजी तालुकाध्यक्ष एस आर पाटील नरेंद्र भिकनराव पाटील सचिन विसपुते मधुकर देशमुख नरेश ठाकरे डॉ.नरेंद्र पाटील जहरुद्दीन शेख कासम सुरेश वंजारी बाळू वंजारी बाजीराव पांढरे अमर राजपूत आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.