अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात महिला ठार
प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल तालुक्यातील टोळी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर एरंडोल रस्त्यावर अज्ञात वाहनाने अज्ञात महिलेस धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी घडली असून एरंडोल पोलीस स्टेशनला त्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एरंडोल तालुक्यातील टोळी गावापासून एरंडोल रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर एका अनोळखी महिलेस ( वय ७० वर्षे ) अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तिला डोक्याला हाता पायाला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याने ती जागेवरच मयत झाली. सदर घटना टोळीचे पोलीस पाटील गितेश देविदास मराठे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला कळवली तत्काळ एरंडोल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत महिलेस खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख करीत आहे.