एरंडोल तालुक्यात बुधवारी थकबाकी वसुली कामी १४ मोबाईल टॉवर सील करण्याची कार्यवाही….
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यात महसूल थकबाकीच्या वसुली कामी बुधवारी १४ मोबाईल टॉवर सील करण्याची कार्यवाही करण्यात आली अशी माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी दिली. एरंडोल महसूल यंत्रणेने महसूल थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम राबवली असून थकबाकी वसुली कामी मोबाईल टॉवर सिल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे त्यामध्ये रिलायन्स जिओ मोबाईल टॉवर पाच , इंडेक्स मोबाईल टॉवर सात , एअरटेल मोबाईल टॉवर एक व आयडिया मोबाईल टॉवर एक यांचा समावेश आहे उर्वरित २७ मोबाईल टॉवर ३० नोव्हेंबर रोजी पूर्णतः हा सील करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.
एरंडोल तालुक्यात एकूण ४२ मोबाईल टॉवर असून त्यापैकी एक मोबाईल टॉवर यांनी त्यांच्याकडून जमीन महसुलाची संपूर्ण रक्कम भरणा केला आहे उर्वरित ४१ मोबाईल टॉवर धारक यांना जमीन महसुलाची थकबाकीची रक्कम शासनास भरणा करणे कामी वेळोवेळी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत त्यांना पुरेशी संधी देऊनही त्यांनी महसूल थकबाकीच्या रकमा भरणा न केल्याने मंडळ अधिकारी यांना ४१ मोबाईल टॉवर २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सील करणे कामी सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार मोबाईल टॉवर सील करायची कारवाई करण्यात आली.