राष्ट्रीय छात्र सेनेमार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातून जनजागृती पर रॅली
प्रतिनिधि – रा ति.काबरे विद्यालय एरंडोल येथे राष्ट्रीय छात्र सेनेमार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त शहरातून जनजागृती पर रॅली काढण्यात आली.यावेळेस एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शहरातून विविध ठिकाणी रॅली काढून शहरातील नागरिकांना एड्स संदर्भात जनजागृती पर घोषणा दिल्या व एनसीसी शिक्षकानी विद्यार्थ्यांना एड्स आजारासंदर्भात माहिती सांगितली व त्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाय देखील सांगितले .
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.शरद भाऊ काबरा , समन्वय समिती अध्यक्ष संजय भाऊ काबरा , संस्थेचे चिटणीस श्रीकांत भाऊ काबरा , मुख्याध्यापिका सौ. रोहिणी मानुधने, पर्यवेक्षक नितीन कलंत्री आ ,एनसीसी शिक्षक अमोल वाणी तसेच इतर शिक्षक वृंद उपस्थित होते .