एरंडोल येथील अमरजितसिंग पाटील यांची भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी जिल्हा संयोजक पदी निवड.
प्रतिनिधी – एरंडोल येथील अमरजितसिंग साहेबराव पाटील यांची क्रीडा आघाडी जिल्हा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.अमरसिंह पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्या घेऊन संघटना वाढीसाठी कार्यरत आहेत. त्यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता खेळ व खेळाडूंच्या प्रगती व कल्याणाकरता केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना पक्षाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन अथक परिश्रम करून तसेच खेळाडू व प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी ( प्रकोष्ट ) महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडी ( प्रकोष्ट) जळगाव पश्चिम जिल्हा संयोजक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नमो चषकला सुरुवात होणार असून त्या माध्यमातून सर्व युवा खेळाडूंना बक्षीसे, मेडल्स, प्रमाणपत्रे व प्रोत्साहन देऊन भारतीय जनता पार्टीची विचारधारा व सरणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम होणार आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष, मुरलीधर अण्णा मोहोळ प्रभारी क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश, पैलवान संदीप भोंडवे संयोजक क्रीडा प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश तसेच ना. गिरीश महाजन,आपले लोकप्रिय खा.उन्मेश पाटील, आ.मंगेश चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, एरंडोल पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पवार, आ.राजू मामा भोळे, मा.आ.स्मिताताई वाघ, पाचोरा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे,एरंडोल लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष भिका कोळी, जिल्हा चिटणीस निलेश परदेशी,सचिन विसपुते,एरंडोल तालुका अध्यक्ष राजेंद्र सिंग पाटील, शहराध्यक्ष नितीन महाजन, माजी नगरसेवक योगेश महाजन, सुनिल भैया पाटील, एस. आर. पाटील, पिंटू राजपूत, मधुकर देशमुख, माजी नगरसेवक शाम ठाकूर, विवेक ठाकूर,बाजीराव पांढरे, यश महाजन, सुरेश वंजारी, बाळू वंजारी , भगवान मराठे, जितु पाटील , मयूर ठाकूर,आनंद सुर्यवशी, भुषण बडगुजर,यांनी शुभेच्छा दिल्या.