पातरखेडा येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
एरंडोल:-तालुक्यातील पातरखेडा येथे शुभम गुलाब पाटील वय २३ वर्षे या युवकाने त्याच्या घराच्या अंगणात निबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली ही घटना १९ डिसेंबर २०२३ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मृत तरुणाचा चुलता समाधान छगन पाटील , सोपान मधुकर पाटील ,राज गुलाब पाटील यांनी त्याला खाली उतरवून खाजगी वाहनाने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय तपासणी आणते तो मृत झाल्याचे घोषित करण्यात आले याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पीएसआय विकास देशमुख हेड कॉन्स्टेबल राजेश पाटील हे पुढील तपास करीत आहेत.