सफाई कामगारांच्या समस्या सोडविण्यात याव्या ; अखिल महाराष्ट्र सफाई कामगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
एरंडोल – महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी अनेक शासन निर्णय परिपत्रके व सुचना सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आलेले आहेत परंतु त्यांची अंमलबजावणी नगरपरिषद येथे दिसत नसल्याने अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एरंडोल येथील मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांची समक्ष भेट घेऊन सफाई कामगारांच्या प्रलंबित समस्या व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली व निवेदनही देण्यात आले.
यात प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत सर्व सफाई कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यात यावे. व सफाई कर्मचारी राहत असलेली नगरपरिषदेने बांधून दिलेली घरे मालकी हक्काने नावे करण्यात यावे.
1 नोव्हेंबर 2005 पासून सेवेत नियुक्त झालेल्या मयत व वैद्यकीयदृष्ट्या अपात्र सफाई कामगाराच्या वारसाला पेन्शन उपदान अदा करण्यात यावी.
या प्रमुख मागण्यासह इतर अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात झाली.
यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन धोरणाप्रमाणे तात्काळ कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केले.
याप्रसंगी संघटनेचे राज्याचे प्रसिद्ध प्रमुख युवराज खोकरे, राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाल, राज्य अध्यक्ष नागेज कंडारे हे उपस्थित होते