हायवे चौफुलीवर वरती बॅनर्स सुळसुळाट व खाली वाहनांचे पार्किंग….
प्रतिनिधी एरंडोल येथे हायवे चौफुलीवर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपरी करण करण्याच्या कामात भराव पुलाचे काम करण्यात आले आहे या ठिकाणी वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून बोगदा असून या बोगद्याच्या वरच्या दोन्ही बाजूस विनापरवानगी व मोठे बॅनर्स तर खाली तासन तास काही वाहने पार्किंग केली जात आहे या प्रकारामुळे चारही बाजू कडून येणाऱ्या वाहनांची कोंडी होते त्यामुळे भविष्यात या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकतो अशी जाणकारांना कडून भीती व्यक्त केली जात आहे..
एरंडोल येथे हायवे चौफुलीवर वाहतूक मोकळी व सुरक्षित व्हावी म्हणून रुंद असा बोगदा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर उभारण्यात आला आहे सदर बोगद्याची जागा रुंद असली तरी तासन तास काही वाहने उभी केली जातात त्यामुळे बोगद्याची जागा अरुंद झाली आहे धरणगाव,धुळे व दत्त कॉलनी शिवाजीनगर येणारी वाहने बोगद्यात शिरताना पार्किंग केलेल्या वाहनामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो परिणामी मोठा अपघात होण्याचा संभव असल्याचे बोलले जाते अशीच स्थिती पूर्व बाजूला सुद्धा आहे तरी बोगदा रहदारीसाठी मुक्त करावा जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल अशी नागरिकांची मागणी आहे.
बोगद्याच्या वरती दोन्ही बाजूला विना परवानगी लावण्यात आलेले मोठ मोठे बॅनर्स जर अचानक खाली पडले तर ये-जा करणारी शाळकरी मुले व पादचारी यांच्या जीवाला धोका होऊ शकतो याकरिता सदर स्थळ बॅनर मुक्त करावे अशी सुजाण नागरिकांची अपेक्षा आहे