यावल येथे साखरपुड्यात लावले लग्न : समाजापुढे नवा आदर्श
यावल प्रतिनिधि अमीर पटेल
शहरातील विरार नगर येथील शेख नसिर शेख हाफिज यांची कन्या महेजबीन शेख आणि (होडी बगला सुरत ) येथील शेख शगीर शेख हाफिज यांचे पुत्र शेख रेहान शेख शगीर दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी सोबत साखरपुडा यावल विरार नगर येथे होता परंतु वरा कडील मंडळी यांनी साखरपुड्यात लग्न लावून देण्याचा प्रस्ताव मांडला व दोन्ही वर – वधू पक्षांकडील मंडळीनी प्रस्ताव लगेच स्विकार केला .
महागाईच्या काळात गोर गरीब जनतेचे हाल होत असतांना अशा प्रकारे विवाह करून सगळ्या गोष्टीची बचत , विनाकारण होणारा खर्च वाचला वाचला पाहिजे . वर – वधू दोन्ही कडील मंडळींनी लोकांना साखरपुड्यात विवाह करून एक चांगला आदर्श प्रत्येक समाजापुढे ठेवला आहे कुदबा पठण करून विवाह लावला या आदर्श विवाहात
शेख शकील शे. हाफिज , शेख कादिर शे. गनी, शेख कलीम शे. गनी , शेख जलिल शे. रज्जाक , शेख तनवीर शे. नसीर , शेख तौकीर शे. नासिर समाज बांधव उपस्थित होते .