एरंडोल येथे भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न.
अनेक महिलांनी केला पक्ष प्रवेश.
प्रतिनिधी – एरंडोल येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी एरंडोल, पारोळा व भडगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा सुपर वॉरियर्स, सर्व आजी माजी पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांची विस्तृत बैठक जिल्हाअधक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर व विधानसभा निवडणुक प्रमुख पारोळा लोकनियुक्त नगर अध्यक्ष करण पवार, एरंडोल चे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.याप्रसंगी एरंडोल शहरातून असंख्य महिलांनी भाजपात प्रवेश केला.
एरंडोल शहरातील मीनाक्षी पाटील,प्रतिभा पाटील,मंगलाबाई पाटील,ज्योतीबाई महाजन,शालिनीबाई पाटील,लताबाई पाटील,भारती पाटील तेजस्विनी पाटील,भारती महाजन,वैशाली महाजन, आशाबाई पाटील, मंगलाबाई महाजन,सुरेखाबाई देशमुख,छाया देशमुख, वैशाली पाटील,दीपमाला जगताप,मंगलाबाई महाजन,नयना महाजन,सरला महाजन, जया महाजन,आशा महाजन या महिलांनी भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,जळगाव लोकसभा समन्वय अजय भोळे,लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी,लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी मा.उपनगराध्यक्ष योगेश महाजन याच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
या वेळी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहम्मद पठाण,जिल्हासरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हाचिटणीस निलेश परदेशी,रेखा चौधरी,पारोळा उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान,नगरसेवक मनोज जगदाळे,सुनीलभैय्या पाटील,पी.जी.पाटील,भैय्या चौधरी,एस.आर.पाटील,नरेंद्र पाटील,एरंडोल भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,शहराध्यक्ष नितीन महाजन,सचिन विसपुते,पारोळा शहराध्यक्ष मनीष पाटील यांची प्रमुख उपस्थिति होती.
बैठकीचे वैशिष्ट्य – गेल्या अनेक वर्षापासून पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रेकॉर्ड ब्रेक अशी बैठक झाली. बैठकीचे स्वरूप एवढे मोठे होते की बैठक ही विश्रामगृहाच्या हॉलमध्ये न घेता सदर बैठक शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मोकळ्या मैदानात घ्यावी लागली. सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि अगदी खेळीमेळीच्या व आनंदाच्या वातावरणात ही बैठक संपन्न झाली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एरंडोल शहरातील व ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.