दिव्यांग बांधव व महिला यांनी दिले मागण्यांचे निवेदन….

IMG-20231227-WA0038.jpg

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील निपाणे गावातील रहिवासी दिव्यांग बांधव व महिला यांनी २७ डिसेंबर २०२३ बुधवार रोजी तहसीलदार सुचिता चव्हाण व पंचायत समिती गट विकास अधिकारी साहेब यांना राष्ट्रीय आय काँग्रेस ओबीसी सेल अल्पसंख्यांक आघाडी व मनसे व दिव्यांग बांधव यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले
एरंडोल तालुका निपाणे गावातील दिव्यांग बांधवांना व महिलांना शासकीय योजना , शासकीय अनुदानाच्या व अन्नसुरक्षा अंत्योदय धान्य योजनेचा कुटुंबांना लाभ मिळण्यात यावा या आशयाचे निवेदन तहसीलदार व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना देण्यात आले या प्रसंगी एरंडोल तालुका काँग्रेस मागासवर्गीय तालुका अध्यक्ष पितांबर अण्णा सोनवणे , काँग्रेस कार्यकारी तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी , मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख कलीम , अल्पसंख्याक शहराध्यक्ष आयास मुजावर , जिल्हा सोशल मीडिया प्रमुख मकसूद भाई पटेल दिव्यांग महिला सरूबाई प्रकाश भिल , अलकाबाई तानू भिल , आरती गोकुळ भिल , अलकाबाई शिवदास पाटील , ममता विनोद पाटील दिव्यांग बांधव गोकुळ भिल , नरेंद्र मधुकर सरदार , मनीष तुकाराम माळी , गणेश रवींद्र माळी , हितेश योगेश पाटील , बापू भानुदास पाटील युवराज चिंतामण चित्ते , हर्षल कैलास पाटील आदी उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!