पेंशन जनजागृती सत्याग्रह पदयात्रेचे एरंडोल येथे स्वागत
प्रतिनिधी – राज्य सरकारने शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जूनी पेंशन लागू करावी या साठी पेंशन योध्दे आर डी निकम यांनी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापासून पेंशन जनजागृती सत्याग्रह पदयात्रेला सुरवात केली सदर पदयात्रा बुधवारी एरंडोल येथे आल्यानंतर जळगाव ते मुंबई पेंशन जनजागृती पदयात्रा करणारे पेंशन योध्दा आर डी निकम सर यांचे जोरदार स्वागत करण्यात आले व एकच मिशन जूनी पेंशनचा नारा देण्यात आला जो पेंशन की बात करेगा वही देशपर राज करेगा अशा घोषणा देण्यात आल्या. या पूर्वी आर डी निकम सर यांनी मुंबई ते दिल्ली पेंशन जनजागृती सायकलवारी केली आहे त्यांच्या जळगाव ते मुंबई पदयात्रेच्या स्वागत प्रसंगी जळगाव माध्यमिक पतपेढीचे माजी संचालक राजेंद्र शिंदे सर मुख्याध्यापक संघाचे माजी तालुका अध्यक्ष बी वाय पाटील,पी.बी.महाजन,मोठा भाऊ एरंडोल धरणगाव तालुका शिक्षक पतपेढीचे तज्ञ संचालक दिनेश चव्हाण सर शिक्षक भारतीचे अमोल वाणी सर ,आनंदा ठाकूर सर,मराठे सर व शिक्षक हजर होते.