रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक मिश्रा यांची अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट
अमळनेर प्रतिनिधी :- पश्चिम रेल्वे चे महाव्यवस्थापक अशोक मिश्रा यांनी आज सकाळी ११ वाजता विशेष रेल्वेने अमळनेर रेल्वे स्थानकाला भेट दिली.यावेळी त्यांच्यासोबत रेल्वे विभागाचे २० हुन अधिक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक मिश्रा यांनी अमळनेर रेल्वे स्थानकावर येऊन पूर्ण स्थानकाचे निरीक्षण केले.तसेच अधिकाऱ्यांना त्यांनी विविध सुचना दिल्या व रेल्वे स्थानक परिसरात असणाऱ्या रेल्वे बाल उद्यान व योग उद्यान या दोघांचे उद्घाटन केले.महाव्यवस्थापक येण्याआगोदरच रेल्वे स्थानकाला कलर व साफसफाई करण्यात आली होती. यावेळी नीरज अग्रवाल यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. यात भुसावळ हुन धरणगाव-अमळनेर-नंदुरबार-वसई रोड-पुणे अशी नवीन रेल्वे सुरू करावी.मुंबई सेंट्रल-भुसावळ रेल्वे कायमस्वरूपी सुरू ठेवावी.रेल्वे साहित्याची चोरी होऊ नये म्हणून बांधलेल्या शेड ला संरक्षण भिंत बांधणे.सुरत-भुसावळ पॅसेंजर जुन्या वेळेनुसार चालावी. अमरावती सुरत एक्सप्रेस आठवड्यातील सहा दिवस करणे,अमळनेर स्थानकावर ओखा-पुरी व प्रेरणा एक्सप्रेस यांना थांबा द्यावा.चौबारी रेल्वे क्रॉसिंग १३० वर नवीन बोगदा बांधण्यात यावा.भोणे स्थानकावर क्रॉंकीट रस्त्याची निर्मिती करण्यात यावी.भाजीपाला व इतर मालाची बुकिंग अमळनेर व धरणगाव येथून करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात यावी.तसेच वापी आणि बेस्टन स्थानकावर मोबाईल व पर्सच्या वाढत्या चोऱ्या नियंत्रित कराव्यात व मारवड व गलवाडे परिसरातील नागरिकांना बीआर क्र.३११ येथे दुचाकी व गाड्यांची ये- जा करण्यास परवानगी द्यावी.अशा मागण्या करण्यात आल्या. तर बोरिवली- नंदुरबार ही रेल्वे नंदुरबार स्थानकावर सुमारे ५ तास थाबते.तिला नंदुरबार ला न थांबवता तिला धरणगाव पर्यंत सुरू करावी.जेणेकरून ह्या नागरिकांना मुंबई जाण्यासाठी हाल होणार नाहीत.अशी मागणी आधार संस्थेचे आशपाक शेख,डॉ.इमरान अली,इमरान कुरेशी यांनी केली.यावेळी आरपीएफ चे एसआय कुलभूषण सिंग चौहान यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.