मुख्याधिकारी विकास नवाळे यांना कर्मचा-यांतर्फे फुलांचा वर्षाव करून निरोप.
एरंडोल – शहरात ‘पुस्तकांचा बगीचा’ सारखा राज्यात पहिलाच उपक्रम राबवून एरंडोलाची वेगळी ओळख निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका असलेले पालिकेचे
मुख्याधिकारी विकास नवाळे यांची शेवगाव येथे बदली झाल्यामुळे पालिका कर्मचा-यांतर्फे त्यांचेवर फुलांचा वर्षाव करून निरोप देण्यात आला.यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे आणि त्यांच्या परिवाराची वाजंत्री लाऊन
बग्गीतून मिरवणूक काढण्यात आली.यावेळी कर्मचा-यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी भावनाविवश झाले होते. शहरात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मुख्याधिकारी विकास
नवाळे विविध उपक्रम राबवून नागरिकांची मने जिंकली होती.’पुस्तकांचा बगीचा’ आनंदनगर येथे उभारून राज्यात शहराची वेगळी ओळख निर्माण केली होती.विद्यार्थ्यांसाठी ‘कर्मवीर अभ्यासिका’ सुरु करून विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचे पुस्तके उपलब्ध करून दिले आहेत.मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या कार्यकाळात शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आणि आमदार चिमणराव पाटील यांच्या शासनस्तरावरील पाठपुराव्यामुळे शहरात विविध विकासकामे पूर्ण केली आहेत. शहरातील नवीन वसाहतींमधील मोकळ्या जागांवर
सार्वजनिक उद्यानांची निर्मिती करून त्यांचे सुशोभिकरण करण्यात आले.कासोदा रस्त्यावरील दुर्लक्षित असलेल्या सार्वजनिक उद्यानाचे सुशोभिकरण करून महिला ब बालकांसाठी हक्काची जागा उपलब्ध करून दिली
आहे.पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ असलेल्या मोकळ्या जागेवर विविध फळझाडे,फुलांची लागवड करून ‘वसुंधरा पार्क’ची निर्मिती केली.वसुंधरा पार्कची देखभालची जबाबदारी महिला बचत गटाकडे देवून महिलांना रोजगार
उपलब्ध करून दिला.प्लास्टिकची अंत्ययात्रा,वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन,स्वच्छता यासारखे पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.या प्रमुख विकास कामांसह शहरात विविध कामे करून मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी कार्याची
झलक दाखवली होती.मुख्याधिकारी विकास नवाळे यांची शेवगाव येथे बदली झाल्यामुळे त्याना कर्मचा-यांच्यावतीने निरोप देण्यात आला.
यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पुस्तकांचा बगीचा,कर्मवीर अभ्यासिका या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.या उपक्रमांमुळे मोबाईलच्या आहारी गेलेले
विद्यार्थी,नागरिक,महिला भविष्यात वाचनाकडे वळतील असा विश्वास व्यक्त केला.शहरातील नागरिकांनी , राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांच्या
पदाधिका-यांनी प्रत्येक कामासाठी,उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,डॉ.नरेंद्र पाटील,अशोक मोरे,अनिल महाजन,एस.आर.ठाकूर,मुकेश पवार,सुरेश दाभाडे,कुणाल कोष्टी,राकेश पाटील,शुभम गायकवाड यासह
मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या कार्याचे कौतुक केले.पालिका कर्मचारी,विविध संघटनांच्यावतीने मुख्याधिकारी विकास नवाळे यांचा सत्कार करण्यात आला.शरद राजपूत यांनी प्रास्ताविक केले.करनिरीक्षक अजित भट यांनी सुत्रसंचलन केले.योगेश सुकटे यांनी आभार मानले.कार्यक्रमास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे,उपनिरीक्षक शरद बागल,गटविकासअधिकारी दादाजी जाधव,पारोळ्याचे तहसीलदार किशोर चव्हाण,माजी
उपनगराध्यक्ष कुणाल महाजन,छाया दाभाडे,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,योगेश महाजन यांचेसह पालिका कर्मचारी,माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, आर.के.पाटील, विक्रम घुगे,भूषण महाजन,देवेंद्र शिंदे यांचेसह पालिका कर्मचा-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.