सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयाचे जिल्हास्तरिय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
धरणगाव ( प्रतिनिधी )
धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरावरील १४ वर्षातील हॉलीबॉल मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवला.या संघात चैतन्य महाजन, मोहित परदेशी, कुणाल माळी, गौरव माळी, कौस्तुभ नारखेडे, नीरज भांडे, पवन बडगुजर आर्यन वाजपेयी, प्रथमेश भागवत, तेजस महाजन, कृष्णा चौधरी व निपुण लोहार हे खेळाडू होते. त्याचप्रमाणे १४ वर्षातील नयन पाटील व अनुष्का चौधरी यांनी ८० मी हर्डल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
तसेच जिल्हास्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धेत मुलींच्या संघाने उपविजेता म्हणून यश मिळवल. यामध्ये साक्षी भोई, दामिनी महाजन, रिया महाजन, धनश्री मराठे, अदिती पाटील, कावेरी भोई, मोहिनी सोनवणे, सोनाली बडगुजर व नेहा अमृतकर या विद्यार्थिनींनी चांगला खेळ केला. त्यांच्या या यशाबद्दल माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री .एस एस पाटील सर, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक श्री .जीवन पाटील सर तसेच ज्येष्ठ शिक्षक किशोर चौधरी ,के जे पवार डी आर चव्हाण यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेतील क्रीडा शिक्षक श्री .एस एस सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले.