सारजाई कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप
( प्रतिनिधी ) – धरणगाव येथील सारजाई दामोदर कुडे व बालकवी ठोंबरे विद्यालयात नुकताच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन सर हे उपस्थित होते.सोबत माध्यमिक विभाग मुख्याध्यापक एस एस पाटील सर,प्राथमिक विभाग मुख्याध्यापक जीवन पाटील सर व किशोर चौधरी सर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. रमेश महाजन यांनी विद्यार्थ्यांना मनोगतात म्हटले की,परीक्षा देतांना संयमाने पेपर लिहा,यश हमखास मिळते.शाळेचे मुख्याध्यापक एस एस पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गुरुजनांबद्दल आभार व्यक्त केले.तसेच शाळेतील ए.एच पाटील ,आर डी महाजन, सागर पाटील यांनीही मार्गदर्शन केले.याप्रसंगी इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम के गायकवाड व आभार सरोज तारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.