शास्त्री महाविद्यालयात मराठीभाषा गौरव दिन साजरा
प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयात दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठीभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपप्राचार्य डॉ पराग कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संगितले की मराठी भाषा गौरव दिन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवि वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनी साजरा केला जातो. मराठी भाषा आपली मातृभाषा असल्याने आपल्याला याचा सार्थ अभिमान असला पाहिजे. आपल्याला औषध निर्माण शास्त्राचा अभ्यास इंग्लिश मध्ये जरी असला तरी तो आपण मराठी भाषेत समजून घेतल्यास तो विषय चांगल्या प्रकारे समजावला जाऊ शकतो. कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि सचिव सौ. रूपा शास्त्री यांची मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. मंगेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे, प्रा. सूमेश पाटील, सौ. मीना मोरे व इतर शिक्षक कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदले यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विशेष प्रयत्न केले