चार तासाच्या ठिय्या आंदोलनानंतर अंडरपास व समांतर रस्त्यांसाठी मिळाले महामार्ग प्राधिकरणाकडून लेखी आश्वासन….
एरंडोल बंदला उस्फूर्त प्रतिसाद…
एरंडोल: येथे राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात राहिलेल्या असुविधा व त्रुटी दूर करण्यासाठी तसेच अमळनेर नाक्याजवळ व्हेईकल अंडरपास, बीएसएनएल कार्यालयाजवळ अंडरपास बोगदा महाजन नगरपासून ते दत्त मंदिरापर्यंत गटारी सह समांतर रस्ते या प्रमुख मागण्यासाठी येथे अमळनेर नाक्याजवळ महामार्गावर गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून दुपारी २.४५ वाजेपर्यंत महाठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समितीचे सर्व पदाधिकारी शहरातील व्यापारी नागरिक नंदगाव पिंपळकोठा बुद्रुक पिंपळकोठा खुर्द पिंपरी बुद्रुक पिंपरी प्र चा , जवखेडा खुर्द जवखेडा बुद्रुक या गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले . विशेष आहे की ग्रामीण भागातील शेतकरी बैलगाड्या घेऊन आंदोलनात सहभागी झाले.. एक उत्साही १५ वर्षीय मुलाने घोड्यावर आरुढ होऊनआंदोलन स्थळ गाठले. महामार्ग चौपदरीकरण समस्या निवारण नागरिक कृती समितीतर्फे सदर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावर थांबलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.तरी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलनकर्ते यांनी बसेस करिता रस्ता मोकळा करून देत होते.पावणेतीन वाजेच्या सुमारास महामार्ग प्राधिकरण यंत्रणेचे प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी समांतर रस्ते व अंडरपास या संदर्भात लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलनाची सांगता झाली. असता उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ व नागरिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत एरंडोल येथे सर्व व्यापाऱ्यांनी व विक्रेत्यांनी उत्स्फूर्त बंद पाळला. सकाळी अकरा वाजता अमळनेर नाका येथे महामार्गावर प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी, व समस्या निवारण नागरिक कृती समितीचे पदाधिकारी, नागरिक व ग्रामस्थ यांनी ठिया आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी अंडरपास झालाच पाहिजे, महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्ते झालेच पाहिजे, दोन्ही बाजूला गटारी झाल्याच पाहिजे, अशा प्रमुख घोषणा देण्यात आल्या,. माजी पालक मंत्री डॉक्टर सतीश पाटील, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर हर्षल माने, डॉक्टर संभाजी पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा घोषित केला आणि आंदोलन कर्त्यांचे मनोबल वाढवले, या आंदोलन प्रसंगी नाना पोपट महाजन, दशरथ महाजन, बी . एस . चौधरी,गोरख चौधरी ,कैलास महाजन, पंकज महाजन , विजय महाजन ,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व देविदास महाजन, अमित पाटील, रोहित पवार,जगदीश ठाकूर, रमेश महाजन, किशोर निंबाळकर, जगदीश पाटील, अभिजीत पाटील, अतुल पाटील, एस आर पाटील सचिन विसपुते, दुर्गादास महाजन, गणसिंग पाटील, आर एस पाटील, राजेंद्र शिंदे, डॉक्टर फरहाज बोहरी, नितीन बिर्ला. मयुर महाजन,परेश बिर्ला ,अतुल महाजन, ऍड .आकाश महाजन, आय जी माळी सर, कमर अली सैयद,कुणाल महाजन, आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार सुचिता चव्हाण, यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन प्रशासनाची बाजू मांडली.
डी वाय एस पी नंदवाडकर,पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल.
अनिल पाटील ,पंकज पाटील, सुनील लोहार, राजेश पाटील, मिलिंद कुमावत, यांनी चोख बंदोबस्त केला.
अमळनेर नाक्याजवळ अंडरपास बांधून मिळण्यासाठी मुख्य महाप्रबंधक तथा क्षेत्रीय अधिकारी नागपूर यांच्याकडे परवानगी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूस समांतर रस्ते व गटारी बांधण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे, बीएसएनएल कार्यालय जवळ अंडरपास बोगदा, साठी कार्यवाही सुरू आहे. असे लेखी निवेदन प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.