एरंडोल तालुका तथा शहरात अवैध धंद्यांना आला ऊत…
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यात तथा शहरात अवैध धंद्यांना ऊत आला असून यामुळे अनेक घरे संसार , तरुण देशोधडीला लागत आहे यामुळे तालुका तथा शहरातील सुज्ञ नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे व सदर धंद्यांना चाप लावण्यास संबंधित विभाग पुढाकार घ्यावा अशी मागणी जोर धरत आहे.
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा , उत्राण , कासोदा , उमरदे व एरंडोल शहर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सट्टा बेटिंग घेतली जाते तसेच परिसरात व शहरात पत्त्यांच्या क्लब सुरू आहे गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत असून याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे की जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असे जाणकारांचे मत आहे दरम्यान एरंडोल शहरात असंख्य सट्टा पिढी आहेत. व सदर व पेढया मध्ये खुलेआम दिवसा ढवळ्या सट्टा खेळला जातो तसेच तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये सुद्धा अशाप्रकारे प्रमुख व्यक्तींकडून अनेक सट्टा पिढ्यांवर सट्टा खेळला जात असून यात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे याबरोबर तालुका व परिसरात काही हॉटेल्स व खाजगी ठिकाणी सर्रास पत्त्याचे क्लब सुरू असून तेथे सुद्धा दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे तसेच शहरातील नथू बापू दर्ग्याजवळ , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमध्ये व मेन रोडवर तसेच तालुक्यातील काही प्रमुख गावांमध्ये अवैध गुटखा विक्री होत असल्याची चर्चा आहे याबद्दल सुज्ञ नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून याबाबत संबंधित विभागाने झोपेचे सोंग न घेता कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे