राष्ट्रीय महामार्ग अडवल्या प्रकरणी आंदोलकांवर गून्हा दाखल…

images-5.jpeg

एरंडोल – जिल्हाधिकारी जळगांव यांचे जमाव बंदीचे आदेश असताना गैर कायद्याची मंडळी जमवून राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर वाहतूक पुर्णपणे अडवल्या प्रकरणी २४ जणां विरूद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भा. द. वी. कलम १८८ ,१४३ ,३४१ व म. पो. का. क.३७ ( १ )( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे फिर्यादीत नोंद केली आहे.
गुरुवारी एरंडोल येथे अमळनेर नाक्या जवळ चौपदरी हायवे वरील समस्या व त्रुटी दुरुस्त व्हावी या मागणी साठी ठिय्या आंदोलन कऱण्यात आले होते. आरोपी मध्ये दशरथ महाजन, विजय महाजन, नाना भाऊ महाजन, अमित पाटील, दुर्गादास महाजन,जगदिश ठाकुर, किशोर निंबाळकर, रमेश महाजन, राजेंद्र चौधरी, राजेंद्र महाजन,किशोर महाजन, डॉ. फरहाज बोहरी, परेश बिर्ला, अतुल महाजन, प्रमोद महाजन, शेख कालू शेख सांडू, गोपाल महाजन, किरण चौधरी, किरण महाजन, गोरख चौधरी,बी. एस. चौधरी, प्रा.शीवाजिराव अहिरराव, कैलास महाजन, पंकज महाजन व इतर १५० ते २०० जणांचा आरोपी मध्ये समावेश आहे. आरोपींनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अडवून आंदोलन सुरु ठेवून शासकीय आदेशाचे उल्लंघन केले आहे. असे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!