चहाचे बिल न दिल्याने रेल्वेने केला कॅटरींग ठेकेदाराला १५ हजार रू दंड.
विशेष प्रतिनिधी . सविस्तर माहिती अशी की तक्रारदार ज्ञानमाता सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष .अब्राहम आढाव हे रेल्वेने प्रवास करत असताना चेन्नई ते पुणे हा प्रवास ट्रेन नंबर १२१६४ ने दिनांक ६ जानेवारी २०२४ रोजी करत होते सदर ट्रेनमधील आय आर सी टी सी सेवा पुरवठादार यांच्याकड्डे चहा मागितला होता. त्यांनी चहा दिला परंतु चहाचे बिल मात्र मागूनही दिले नाही.
वास्तविक रेल्वे मध्ये चहा हा १० रु. विकला जातो. पण बिल देण्यास टाळाटाळ का केली जाते आहे म्हणून तक्रारदार यांनी ऑनलाईन १३९ वर तक्रार दाखल केली होती. परंतु रेल्वे अधिकारी यांनी तक्रारदार यांची तक्रारीची दखल वेळेत घेतली नाही म्हणून तक्रारदार यांनी ऑनलाईन माहितीचा अधिकार अर्ज केला सदर तक्रारीची सद्यस्थिती भारतीय रेल्वेकडे मागितली असता भारतीय रेल्वेने त्या कंत्राटदाराला १५००० दंड लावण्यात आला आहे.
अशी माहिती हि माहिती अधिकारातून माहिती प्राप्त झाली आहे.