टपाल कार्यालयातर्फे जागतिक महिलादिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
कार्यालयाची आकर्षक सजावट करून महिलांचा सत्कार.
एरंडोल – येथील टपाल कार्यालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जागतिक महिला दिनानिमित्त टपाल कार्यालयाची आकर्षक सजावट करून सुशोभित करण्यात आले होते . यावेळी टपाल कार्यालयाच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करणा-या महिला ग्राहक,महिला अल्पबचत प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला.रा.ति.काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने अध्यक्षस्थानी होत्या.श्रीमती मनीषा पाटील प्रमुख पाहुण्या होत्या.टपाल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. टपाल कार्यालयात केवळ दैनंदिन व्यवहार करण्यासाठी येत
असतात.
महिलांमध्ये विविध योजनांची जनजागृती व्हावी या उद्देशाने जागतिक. महिला दिनाचे औचित्य साधून कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते.कार्यालयाची करण्यात आलेली सजावट पाहून ग्राहक प्रसन्न झाले होते.जागतिक महिला दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.टपाल कार्यालयात महिला दिनानिमित्त टपाल कार्यालयातर्फे
महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.महिला दिनानिमित्त टपाल कार्यालयाची
आकर्षक सजावट करून महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.यावेळी टपाल खात्याचे कर्मचारी शामकांत सोनवणे यांनी महिलांसाठी असलेल्या महिला सन्मान योजना,मुलींसाठी असलेली सुकन्या योजना यासह विविध योजनांची माहिती दिली.टपाल कार्यालयात विविध योजनांच्या माध्यमातून करण्यात येणारी गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे ग्राहकांचा टपाल
कार्यालयावर विश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.विजय देसले यांनी पोस्टाच्या विम्याबाबत माहिती दिली.ग्राहकांचा टपाल कार्यालयात सन्मान केला जात असून नागरिकांनी टपाल कार्यालयातील योजनांमध्ये गुंतवणूक करावी. असे आवाहन केले.मुख्याध्यापिका रोहिणी मानुधने यांनी महिलांनी नियमित बचत करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन केले.बचतीचे महत्व याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी संगिता पुरभे,गणेश मालपुरे,नितेश सोनार , आसिफ पटेल,प्रियंका पवार,अनुसया पवार,वंदना पाटील यांचेसह महिला अल्पबचत प्रतिनिधी,गुंतवणूकदार महिला यांनी मनोगत व्यक्त करून टपाल कार्यालयातील
कर्मचा-यांकडून करण्यात येणा-या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.यापूर्वी देखील उपडाकपाल डॉ.चेतन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीत कर्मचा-यांनी स्वखर्चाने कार्यालयात आकर्षक सजावट करून एकत्रितपणे दिवाळी साजरी करून राज्यात आदर्श उभा केला होता.यावेळी
सुकन्या योजना,महिला सन्मान योजना यामध्ये गुंतवणूक करणा-या महिलांचा सत्कार करण्यात आला.तसेच महिला अल्पबचत प्रतिनिधींचा देखील सत्कार करून टपाल कार्यालयाच्या योजनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य केले जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.उपडाकपाल डॉ.चेतन निकम,शामकांत सोनवणे,विजय देसले,दीपक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टपाल कर्मचा-यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात
महिला प्रतिनिधींचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.धनश्री वाघ यांनी सुत्रसंचलन केले.गणेश मालपुरे,धनश्री वाघ,अनुसया पवार,शशिकांत पाटील यांनी कार्यालयाची सजावट केली.कार्यक्रमास रोहिदास
खुनेपिंपरे,निंबा बत्तीसे,विजय सोनवणे,नरेंद्र मुंडके,कैलास जळोदकर,हर्षल साळुंखे,करण भोसले,गौरव पाटील,योगेश पाटील,वृषाली ठाकरे,रवींद्र ब्राम्हणे,अभिषेक पवार,अनिकेत दौंड,शुभम पाटील,हेमंत देवरे,मन्साराम पाटील यांचेसह महिला अल्पबचत प्रतिनिधी,अल्पबचत एजंट,महिला उपस्थित .होत्या.