२० हजारांची लाच घेताना जळगांव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात.

IMG-20240310-WA0024.jpg

जळगाव:– ग्रामपंचायत सदस्य विरुद्ध आलेला अर्ज निकाली काढून आपल्याकडून चांगला अहवाल देण्यासाठी २० हजार रुपये द्यावे लागतील लाच लुचपत विभागाकडून लाचखोर कर्मचारी यांच्यावर धडाकेबाज कारवाई करत दि.९ रोजी १) महेश रमेशराव वानखेडे,(वय ३०) व्यवसाय नोकरी,लिपीक ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव जि.जळगांव,मुळ रा.नेर ता.नेर जि.यवतमाळ व २) समाधान लोटन पवार (वय ३५) व्यवसाय नोकरी,लिपीक,ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव जि. जळगांव रा.लालबाग कॉलणी पारोळा ता. पारोळा जि. जळगांव यांना २० हजार रुपये लाच घेताना जळगाव लाच लुचपत विभागाकडून रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

यातील तक्रारदार हे ग्रामपंचायत निवडणुक २०२१ मध्ये निवडुन आले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे विरुद्ध मा.जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथे रायपूर गावातील गैरअर्जदार यांनी तिन अपत्य बाबत यांनी तक्रारी अर्ज केला होता.सदरचे प्रकरण हे ग्रामपंचायत विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव येथील आलोसे क्र१ यांचेकडे पेडींग होते.त्यानंतर तक्रारदार हे आलोसे क्र.१ यांना त्यांचे कार्यालयात भेटले असता आलोसे यांनी तक्रारदार यांना सांगितले कि तुमचा तिन अपत्य बाबत चांगल्या प्रकारे अहवाल तयार करून तुम्ही अपात्र होणार नाही अशी मदत करतो,त्यासाठी मला ३००००/- रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी दि.०९/०३/२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंध विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती. सदर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारी प्रमाणे पंचा समक्ष पडताळणी केली असता आलोसे क्र.१ यांनी पंचा समक्ष लाचेची मागणी केली. त्यानंतर आज रोजी आलोसे वानखेडे लिपीक यांनी सांगितल्याने आरोपी क्र.२ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात २००००/- रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.त्यांचेवर जिल्हापेठ पोलीस स्टेशन ता.जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

लाच लुचपत परिक्षेत्र नाशिक विभागीय पोलीस अधिक्षक श्रीमती.शर्मिष्ठा घारगे-वालावलकर व अपर पोलीस अधिक्षक .माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली,जळगांव जिल्ह्याचे ला.प्र.विभाग पोलीस उप अधीक्षक,.सुहास देशमुख,सापळाचे प्रमुख पोलीस निरीक्षक .एन.एन.जाधव,सापळा पथकातील दिनेशसिंग पाटील,पो.ना.बाळू मराठे,पोकॉ अमोल सुर्यवंशी, व कारवाई साठी मदत पोलिस निरीक्षक .अमोल वालझाडे,स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर,पो.ना किशोर महाजन,पो.कॉ.प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर,पो.ना.सुनिल वानखेडे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!