जय श्रीराम प्रतिष्ठानला सेवा भारती देवगिरी प्रांत जनकल्याण समिती जळगाव तर्फे सेवा सन्मान पुरस्कार…..
एरंडोल:- येथील श्रीराम चौक बुधवार दरवाजा परिसरातील जय श्रीराम प्रतिष्ठानला सेवा भारती जनकल्याण समिती देवगिरी प्रांत जळगाव तर्फे सेवा सन्मान पुरस्कार दि.८ मार्च २०२४ रोजी डॉक्टर निलेश चांडक, शासकीय महाविद्यालय जळगाव येथील डॉक्टर मारुती पोटे, बाळासाहेब खानविलकर, संदीप कासार सचिव सेवाभावी जळगाव, डॉक्टर नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले.
सदर पुरस्कार हा जिल्ह्यातून निस्वार्थपणे समाजातील दुर्बल घटकांसाठी लहान मोठे कार्य करणाऱ्या सेवा कार्याला प्रेरणा मिळावी यासाठी देण्यात येतो.
यावेळी नितीन पाटील अध्यक्ष जय श्रीराम प्रतिष्ठान, अमर महाजन उपाध्यक्ष, प्रदीप फराटे सचिव, तसेच बाबूलाल महाजन, सदानंद पाटील, अवि जाधव, जितेंद्र पाटील, गणेश पाटील, सुधाकर महाजन, चंद्रकांत महाजन, टिकमचंद शिरवानी,प्रशांत लोहार,धीरज पाटील. या सर्व उपस्थितांसह सन्मान स्वीकारला. शहरात विविध समाज उपयोगी सेवा कार्य करत असताना श्रीराम चौक परिसरातील सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यात लाभत असतो , श्रीराम चौक परिसरातील व शहरातील सर्व नागरिकांच्या सहकार्याने श्रीराम प्रतिष्ठानला गौरविण्यात आले असे संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी सांगितले.