शास्त्री इन्स्टिट्यूट येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरा.
प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे दिनांक ५ मार्च २०२४ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युफोरिया फेस्ट २०२४” आयोजित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मॅक डब्लु इंदोर येथील कंपनीचे संचालक अभिजीत मोतीवाले, अजमेरा हर्बल प्रा.लि. चे संचालक गौरव अजमेरा, प्रा.सुधीर शिरसाठ, सौ रेखा शिरसाठ, माय एफ एम रेडिओ चे स्टेशन हेड अदनान देशमुख इत्यादी मान्यवर व पंचक्रोशीतील पत्रकार उपस्थित होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.तत्पूर्वी आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ.विजय शास्त्री यांनी सांगितले की संस्था अश्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. मॅक डब्लू कंपनीचे संचालक श्री.अभिजीत मोतीवाले यांनी भविष्यात नोकरी संदर्भात संधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले.या कार्यक्रमात उत्कृष्ट शैक्षणिक प्रदर्शन केलेले विद्यार्थी प्रथम वर्ष डी.फार्मसी मधे पहिले निकिता साळी आणि दुसरे क्रमांकाचे पारितोषीक योगिता पाटील तसेच द्वितीय वर्ष डी.फार्मसी मधे पाहिल्या क्रमांकावर हर्षाली पाटील द्वितीय पारितोषीक उदय चव्हाण यांना मिळाले व तसेच प्रथम वर्ष बी.फार्मसी मधे पहिले पारितोषीक वैष्णवी जयस्वाल व द्वितीय पारितोषिक मृणाल कोल्हे व द्वितीय वर्ष बी.फार्मसी मधे पहिले पारितोषिक नकुल सोनावणे व द्वितीय पारितोषीक संकेत ठोसर व तृतीय वर्ष बी.फार्मसी मधे प्रथम पारितोषीक निखिल पाटील व द्वितीय पारितोषीक वैष्णवी सोनार तसेच अंतिम वर्ष बी.फार्मसी प्रथम पारितोषीक रूपेशकुमार जाधव व द्वितीय पारितोषीक सचिन शिंपी यांना देण्यात आले तसेच वर्षाचा सर्वोत्तम विद्यार्थी डी.फार्मसी मधील प्रतीक पाटील व बी.फार्मसी मधील निखिल पाटील यांना देण्यात आले तसेच उत्कृष्ट शिक्षक डी.फार्मसी मधून प्राध्यापक रोशनी पाटील व बी.फार्मसी मधून प्राध्यापक जावेद शेख व सर्वोत्तम नवीन शिक्षक प्राध्यापक सुमेश पाटील व सर्वोत्तम विशेष शिक्षक प्राध्यापक राहुल सुरेश बोरसे व शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणूनं सौ.मीना मोरे यांना गौरवण्यात आले उत्कृष्ट गायन प्रथम क्रमांक सलोनी व द्वितीय क्रमांक साक्षी आणि हेमलता,नृत्य मधे प्रथम पुर्वा मुळे व द्वितीय क्रमांक चे पारितोषिक सलोनी राजपूत प्रतीक पाटील आणि हर्षली ह्यांना गौरवण्यात आले आणि नाटकाचे प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बक्षीसे देवून गौरवण्यात आले. सुधीर शिरसाठ व सौ. रेखा शिरसाठ यांनी ज्यूरी म्हणून जबाबदारी पूर्ण केली.संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री यांची कार्यक्रमाला उपस्थिती लाभली.कार्यक्रम प्रसंगी अनेक पालक देखील आलेले होते.सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेडिओ एफ एम च्या आर.जे शिवानी यांनी केले.उप प्राचार्य डॉ.पराग कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थांचा उत्साह वाढवला तर आभार प्रदर्शन प्रा.मंगेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.जावेद शेख,प्रा.राहुल बोरसे, प्रा.कारण पावरा, प्रा.सुमेश पाटील तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. जनसंपर्क अधिकारी शेखर आर बुंदेले यांचे विशेष सहकार्य लाभले.