शास्त्री फार्मसी टीमला अंतरमहाविद्यालयीन क्रिकेटमध्ये विजेतेपद.
प्रतिनिधी – एस. एस. बी. टी. फार्मसी महाविद्यालयात जळगाव जिल्हा फार्मसी इन्स्टिट्यूट आयोजित NPW2K23 Pharma Cup मध्ये यावर्षी शास्त्री फार्मसी महाविद्यालय एरंडोल यांनी विजेतेपद पटकावले. दि.07/03/24 ते 09/03/24 या दरम्यान हा क्रिकेट महोत्सव एस एस बी टी फार्मसी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. त्यात शास्त्री फार्मसी महाविद्यालयाने सुरुवातीला साखळी सामन्यात स्वतः आयोजक असलेली एस एस बी टी फार्मसी महाविद्यालयाला नमवून उपांत्य फेरीत धडक मारली. त्यानंतर उपांत्य फेरीत त्रिमूर्ती फार्मसी पाळधीला मोठ्या फरकाने तर अंतिम फेरीत सुमनताई फार्मसी महाविद्यालय, पाचोरा विरुद्ध 51 धावांनी विजय मिळवित फार्मा कप NPW2K23 वर आपले नाव कोरले. या विजयात संघातील सर्वच खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवून विजय साकारला असे संघनायक दिग्विजय गिरासे यांनी सांगितले.
या विषयाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तसेच सचिव रूपा शास्त्री यांनी महाविद्यालयात सर्व खेळाडूंचा सत्कार केला. अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विजय शास्त्री यांनी खेळामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो निर्णय क्षमता,सहानुभूती शिस्त,आणि सहकार्याची भावना निर्माण होते आणि या गुणांचा बडावर व्यक्ती कोणतेही कार्य करण्यास सक्षम होतो. हे मोलाचे विचार सोबत संस्थेचे सचिव रूपा शास्त्री व डॉ. विजय शास्त्रींनी मिळवलेल्या विजेतेपदाबद्दल टीमचे भरभरून कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा.जावेद शेख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मंगेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राहुल बोरसे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तथा जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी यांची उपस्थिती लाभली.