आचार संहिता लागु झाल्याने एरंडोल विधानसभा मतदार संघात निवडणुकीची कामे वेगात , विविध पथके नियुक्त…

IMG-20240321-WA0105.jpg

प्रतिनिधी – लोकसभा  निवडणुकीचा कार्यक्रम मा. भारत निवडणूक आयोगाने  घोषित केला असून त्यानुसार मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू झालेला असल्यामुळे  एरंडोल विधानसभा मतदारसंघांतर्गत प्रशासनाने निवडणूक विषयक कामे मुदतीत व वेळेवर पार पाडणेसाठी विविध पथकांची नियुक्ती केलेली असून सदर पथकात नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होणे कामी एफ.एस.टी. नियंत्रण कक्ष , आचारसंहिता कक्ष यांचे तर्फे नियमित काम सुरू असून नागरिकांच्या सुविधेकरिता नियंत्रण कक्षात ०२५८८ – २४४८१८ हा फोन नंबर उपलब्ध करून दिलेला आहे.  आचारसंहिता अंमलबजावणीच्या तक्रारी असल्यास नागरिकांनी या दुरध्वनीवर फोन करून कळवावे असे आवाहन मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल  मनीष कुमार गायकवाड यांनी केले आहे. एरंडोल विधानसभा मतदार संघांतर्गत एकूण २८५८३३  इतके मतदार असून त्यापैकी १४७८८८ पुरुष,१३८३३५ स्त्रिया १० तृतीयपंथी मतदार आहेत.  एरंडोल तालुक्यात१३७ , पारोळा तालुक्यात १२३ , व भडगाव तालुक्यात ३० मतदान केंद्र अशी एकूण २९० मतदान केंद्र ( १६ ) एरंडोल विधानसभा मतदारसंघात निश्चित करण्यात आले असून त्यात ६४  इतके शहरी मतदान केंद्र व २२६ इतके ग्रामीण मतदान केंद्र आहेत.  यापैकी ०३ मतदान केंद्र हे महिला संचलित असून ०२ मतदान केंद्र हे दिव्यांग संचलित व ०१ मतदान केंद्र हे नव कर्मचारी संचलित (युवा मतदान केंद्र) राहणार आहे.  तसेच मतदार संघात एकूण १४ केंद्र हे क्रिटिकल मतदान केंद्र आहेत.  निवडणुकीच्या कामांच्या अनुषंगाने   नोडल व सेक्टर अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.   त्यात उपस्थित ३२ सेक्टर अधिकारी यांना  मनीष कुमार गायकवाड , सहा. निवडणूक निर्णय अधिकारी जळगाव तसेच श्रीमती सुचिता चव्हाण मॅडम , सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांनी मार्गदर्शन केले यावेळी  उल्हास देवरे सर तहसीलदार पारोळा ,  देवेंद्र भालेराव निवडणूक नायब तहसीलदार , दिलीप पाटील निवासी नायब तहसीलदार , मनोहर राजिंद्रे ,  ललित पाटील निवडणूक शाखा एरंडोल हे उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!