मंगळ ग्रह सेवा संस्था व तालुका कृषी विभागाचा संयुक्तिक उपक्रम

InCollage_20240330_181849427.jpg

शेतकरी गट प्रशिक्षण कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था व
तालुका कृषी विभाग यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना इपीए अंतर्गत शेतकरी गट प्रशिक्षण कार्यक्रम तालुक्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले होते. त्यास तालुक्यातील शेतकऱ्यांनी खूप मोठा प्रतिसाद दिला.
पाणलोट विकास घटक २.० अंतर्गत शेतकरी गटांच्या सभा घेण्यात आल्या. त्यात उपस्थितांना गटस्थापनेचा उद्देश ,शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यासाठीच्या महत्वपूर्ण बाबी व त्यांची आवश्यकता आदीबाबत माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तालुक्यातून मुख्य चार गावांची (संलग्न दोन-तीन गावे) निवड करण्यात आली होती. यात तांदळी (निम ,शहापूर मिळून), पाडसे (खेडी, खर्दे, वासरे मिळून), एकलहरे (एक तास, भिलाली मिळून) व कळमसरे या गावांचा समावेश होता.
तांदळी गावातून भूमिपुत्र शेतकरी गट, कृषी समृद्ध शेतकरी गट, कृषी प्रधान शेतकरी गट, शहापूर गावातून गुरुदत्त शेतकरी गट, गौरेश्वर शेतकरी गट, निम गावातून बजरंग शेतकरी गट, चामुंडा माता शेतकरी गट, बळीराजा शेतकरी गट, स्वराज्य शेतकरी गट, एकलहरे गावातून कै.भाऊसाहेब शेतकरी गट, स्वर्गीय दिनकरराव पाटील शेतकरी गट, एकतास गावातून पवनपुत्र शेतकरी गट, युग शेतकरी गट, भिलाली गावातून श्री गणेश शेतकरी गट, हर हर महादेव शेतकरी गट, आत्मविश्वास शेतकरी गट, पाडसे गावातून जय भवानी शेतकरी गट, माऊली शेतकरी गट, खर्दे गावातून जाणता राजा शेतकरी गट, खेडी गावातून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी गट वासरे गावातून राजमाता जिजाऊ शेतकरी गट, कळमसरे गावातून समता शेतकरी गट, सावता शेतकरी गट, श्री दत्तगुरु शेतकरी गट, जय बजरंग शेतकरी गट आदी सर्व गटाचे प्रतिनिधी शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून मंगळ ग्रह सेवा संस्थेचे ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील उपस्थित होते. कृषी पर्यवेक्षक वाय. एल. खैरनार, मंडळ कृषी अधिकारी अविनाश खैरनार, कृषी सहाय्यक अजय पवार, कृषी सहाय्यक विद्या पाटील, कृषी सहाय्यक योगेश कदम, पाणलोट विकास समितीचे समूह सहाय्यक मच्छिंद्र सोनवणे व कृषी तज्ञ विनोद पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांचे यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!