डॉ मयुरी आंधळे लिखित ‘कनकालेश्वर एक रहस्य’ चे प्रकाशन…!
विशेष प्रतिनिधी – भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच प्रस्तुत डॉ मयुरी गजानन आंधळे लिखित कनकालेश्वर एक रहस्य या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. बीड जिल्हा हा देवदेवळांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रभर परिचित आहे. जिल्ह्यात शेकडो ऐतिहासिक मंदिर आहेत त्यांपैकीच बीड शहराच वैभव असलेल बिंदुसरा नदीकाठी वसलेले कनकालेश्वर मंदिराचा इतिहास या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न डॉ. मयुरी आंधळे यांनी केला आहे.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला आदित्य शैक्षणिक संस्थेचे संस्थापक सुभाषजी सारडा, संचालिका आदितीजी सारडा, गजानन आंधळे, सुरेखा आंधळे, भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच चे संस्थापक उपाध्यक्ष विजय जायभाये व आदित्य शैक्षणिक समुहाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.