स्विप कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी यांची एरंडोल शहरात सायकल रॅली.

IMG-20240401-WA0023.jpg


प्रतिनिधी – एरंडोल येथे दि. 31 मार्च 2024,  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 च्या अनुषंगाने, मा. भारत निवडणुक आयोग यांनी नियोजीत केलेल्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे स्विप कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी 03 जळगाव लोकसभा मतदार संघाचे जिल्हा निवडणुक अधिकारी, तथा जिल्हाधिकारी जळगांव आयुष प्रसाद या अंतर्गत 16 एरंडोल विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, तसेच सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण आणि तहसिल कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी तसेच एरंडोल तालुक्यातील शासकीय कार्यालयाचे अधिकारी,कर्मचारी व बीएलओ यांनी तहसिल कार्यालयापासुन सायकल रॅलीला सुरवात केली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जळगांव यांनी स्वतः सायकल चालवत रॅली मध्ये सहभाग घेऊन शहरातील चौका – चौकात राष्ट्र पुरूषांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन व पुजन केले व मतदारांशी संवाद साधुन सर्वांना निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे  मतदान करण्याचे अवाहन केले. या वेळी शहरातील मतदार नागरीक देखील स्वंयस्पुर्तीने या सायकल रॅलीत सहभागी झाले.  सदर रॅलीमध्ये मधुकर ठाकुर कसोदा, ता. एरंडोल यांनी आपला सहभाग नोंदवुन त्यांच्या मतदार जनजागृतीच्या विशिष्ट पध्दतीने सायकल सजवुन आणली आणी मतदार जनजागृती केली.  सदर रॅली एरंडोल शहरातील विविध चौकांमध्ये फिरुन परत तहसिल कार्यालयात रॅलीचे समापन करण्यात आले.  

सदर प्रसंगी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उस्पूर्द प्रतिसाद देवुन रॅली यशस्वी केली त्याबाबत सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल सुचिता चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले व तमाम मतदारांना लोकशाहीच्या या पवित्र उत्साहात म्हणजेच लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2024 च्या दि. 13/05/2024 रोजी होणाऱ्या मतदानात सर्वांनी उस्पूर्त सहभाग घेवुन आपणास घटनेने दिलेला हक्क  बजवावा असे आवाहन केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!