विवाहात सापडलेले नवरदेवाचे दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट केले परत.
रवींद्र सोनार यांचा प्रामाणीकपणा.
एरंडोल-येथील प्रभाकर मेडिकलचे संचालक व्यावसायिक रवींद्र प्रभाकर सोनार यांनी विवाह कार्यक्रमात नवरदेवाचे सापडलेले दीड तोळे वजनाचे आणि सुमारे एक लाख रुपये किमतीचे नवरदेवाचे सोन्याचे ब्रेसलेट प्रामाणिकपणे परत
केले.रवींद्र प्रभाकर सोनार यांच्या प्रामाणिकपणाबद्दल विवाहास उपस्थित असलेले आजी माजी लोकप्रतिनिधी , शासकीय अधिकारी,राजकीय पक्षांचे पदाधिकारी
यांचेसह विवाहास उपस्थित असलेल्या मान्यवरांनी तसेच नवरदेवाच्या आईवडिलांनी रवींद्र सोनार यांचे आभार मानून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
एरंडोल येथील ‘सकाळ’चे तालुका बातमीदार आल्हाद जोशी यांचा मुलगा
हितेश याचा विवाह समारंभ धरणगाव रस्त्यावरील कमल लॉन्स येथे नुकताच
संपन्न झाला.विवाहास ज्येष्ठ पत्रकार तथा प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे , आमदार चिमणराव पाटील , माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील , माजी आमदार
महेंद्रसिंह पाटील , भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख ॲड. किशोर काळकर , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील , किर्गीस्तानचे भारतातील राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, नासिकचे उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे , तहसीलदार सुचिता चव्हाण , बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम
गायकवाड,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर,राजेंद्र चौधरी , यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील , प्रा.मनोज पाटील , ॲड. मोहन शुक्ला , प्राचार्य डॉ.ए.जे.पाटील,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन , नासिक येथील पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांचेसह सर्वच स्तरातील नागरिक उपस्थित होते.
नवरदेव हितेश जोशी यास त्याची आई लीना जोशी यांनी दीड तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट विवाहानिमित्त भेट दिले होते.हितेश जोशी याच्या हातातील ब्रेसलेट पडल्याची कल्पना देखील त्यास झाली नाही.दुपारी विवाह समारंभाचा कार्यक्रम सुरु असतांना प्रभाकर मेडिकलचे संचालक
रवींद्र प्रभाकर सोनार यांना नवरदेवाचे सोन्याचे ब्रेसलेट सापडले.रवींद्र सोनार यांनी ब्रेसलेट सापडले असल्याची माहिती त्यांचे मित्र किर्गीस्तानचे भारतातील राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी यांना दिली.रवींद्र सोनार आणि देवेंद्र साळी ब्रेसलेट सापडले असल्याची माहिती विवाहस्थळी आर्केष्ट्रा सादर करीत असलेल्या प्रा.सुधीर शिरसाठ यांना
दिली.प्रा.सुधीर शिरसाठ यांनी कार्यालयात सोन्याचे ब्रेसलेट सापडले असून ज्या व्यक्तीचे असेल त्यांनी ओळख पटवून घेवून जाण्याचे आवाहन केले.माईकवरून ब्रेसलेट सापडल्याचे समजताच नवरदेव हितेश जोशी याने
त्याच्या हातातील ब्रेसलेट पाहिले असता त्यास ते आढळून आले नाही.नवरदेव हितेश जोशी याने सदरचे ब्रेसलेट माझेच असून विवाहाच्या धावपळीत ते खाली पडल्याचे सांगितले.प्रा.सुधीर शिरसाठ यांनी उपस्थित मान्यवरांच्या समक्ष सोन्याचे ब्रेसलेट नवरदेव हितेश जोशी याच्या ताब्यात दिले.जोशी परिवारातील आल्हाद जोशी,प्राचार्य हर्शल जोशी,कल्पेश राक्षे यांचेसह विवाहास उपस्थित असलेल्या सदस्यांनी रवींद्र सोनार यांचे आभार मानले.तसेच
उपस्थित मान्यवरांनी रवींद्र सोनार यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे अभिनंदन केले.