एरंडोल तालुक्यात मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी केली पाणी टंचाईची पाहणी.
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील गावांची पाणी टंचाई बाबत.जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अंकित सर व उप मुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अनिकेत पाटील यांनी पाहणी केली.
याप्रसंगी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील पिंपळकोठा बु.येथे पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती बाबत ट्यूबवेल ची पाहणी केली व तालुक्यातील संभाव्य दुष्काळ सदृश्य गावातील पशुधनासाठी चारा पाणी बाबत तसेच संभाव्य दुष्काळ सदृश्य गावात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत बाबत गटविकास अधिकारी दादाजी जाधव यांच्याकडून आढावा घेतला व नियोजन करण्याच्या सूचना केल्या.
याप्रसंगी गटविकास अधिकारी दादाजी जाधव,ग्रामपंचायत विस्तार अधिकारी एन.डी.ढाके,चिमणराव पाटील, भरत पाटील,ग्रामपंचायत पाणी पुरवठा शाखा अभियंता शिंदे,ग्रामविकास अधिकारी शेख,ग्रामपंचायत पिंपळ कोठे बु.सरपंच,सदस्य,कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.