एरंडोल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी.

InCollage_20240415_173653451.jpg

प्रतिनिधी – एरंडोल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर सकाळी ९ वाजता सामुहिक बुद्ध वंदना घेऊन माल्यार्पण करण्यात आले.यावेळी प्रांताधिकारी मनिष कुमार गायकवाड,तहसीलदार सुचिता चव्हाण,पोलीस निरीक्षक सतिष गोराडे,पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक शरद बागल,सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,राजेंद्र चौधरी, रवींद्र महाजन , य च.शी.प्र.मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील,माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील,काँग्रेसचे नेते डॉ. फरहाज बोहरी,डॉ.संग्राम पाटील,माजी नगरसेवक डॉ.सुरेश पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकुर,  काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय महाजन, डॉ.सुधीर काबरा,डॉ.राहुल वाघ,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,माजी नगरसेवक नितीन चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर शहरात युवकांनी मोटार सायकल रॅली काढून लक्ष वेधून घेतले.संध्याकाळी जयंती उत्सव समितीच्या वतीने आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.यात असंख्य समाज बांधव व महिला सामील झाले होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ॲड.ईश्वर बिऱ्हाडे,उपाध्यक्ष मोहन सैंदाने,विजय सोनवणे,कार्याध्यक्ष प्रकाश शिंदे,खजिनदार दिपक सोनवणे,सचिव संघरत्न गायकवाड,कार्यवाहक अतुल सोनवणे,नितीन बोरसे,रविंद्र बोरसे,विशाल सोनवणे,संजय बेहेरे,देवानंद निकम यांनी परिश्रम घेतले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!