बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयात भारतरत्न तसेच भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माध्यमिक विभाग मुख्याध्यापक श्री.एस एस पाटील सर यांनी भारतमातेच्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून माल्यार्पण केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक जीवन पाटील सर तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी पी रोकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सांस्कृतिक समिती प्रमुख श्री .कैलास माळी सर, तसेच सदस्य रजनीराणी पवार, के.के चव्हाण, सरोज तारे, पल्लवी मोरे ,शितल वानखेडे व निता महाजन व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.