एरंडोलला महाजन कुटुंबीयांनी वेळेवर लग्न लावून समाजापुढे ठेवला आदर्श
उपस्थित पाहुणे मंडळीनी देखील या उपक्रमाचे केले कौतुक
प्रतिनिधी – एरंडोल येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा साप्ताहिक प्रहार दणकाचे संपादक कैलास परुशुराम महाजन यांची मुलगी वधू अस्मिता व वर हिमांशुराजे अशोक विठ्ठल माळी रा. जयनगर तालुका शहादा यांचे सुपुत्र यांचा विवाह दिनांक १८ एप्रिल गुरुवार रोजी येथील साई गजानन मंदिरा जवळील महात्मा फुले नगर येथे आमंत्रीत पाहुणे मंडळी समक्ष मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात लग्नपत्रिकेवर दिलेल्या मुहूर्तावर वेळेवर सत्यशोधक पद्धतीने संपन्न झाला त्यामुळे उपस्थीत पाहुणे देखील आश्चर्यचकित झाले व लग्न वेळेवर लागल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला व महाजन कुटुंबीयाना धन्यवाद देत समाजापुढे ठेवलेल्या या आदर्शाचे कौतुक करत भविष्यात समाजबांधवनी देखील अशाच रितीने विवाह वेळेवर लावण्याची पद्धत अंमलात आणावी अशी मागणी पुढे आली.
आजकाल वेळेवर लग्न लागणे हे जवळपास दुर्मिळ झाल्यासारखे झाले आहे त्यामुळे वेळेवर लग्न लावणाऱ्या वधू पिता वर पिता यांचे कौतुक उपस्थित समाज बांधवांनी व आमंत्रित पाहुणे मंडळींनी केले कारण लग्नासाठी अनेक जण आपला कामधंदा सोडून उपस्थीती देतात एकाच दिवशी अनेक लग्नानां हजेरी लावायची असते परंतु लग्न मुहूर्तावर लावत नसल्यामुळे पाहुणे मंडळी बराच वेळ मंडपात ताटकळत थांबून राहतात त्यांच्या सोबत असलेल्या महिला बालगोपाळ मंडळी कंटाळून जातात व लग्न कधी लागेल याची उन्हा तान्हात प्रतीक्षा करत राहतात त्यामुळे लग्नासाठी वेळ काढून येणाऱ्या पाहुण्यांच्या भावनांचा देखील लग्न आयोजकांनी विचार करायला हवा व लग्न वेळेवर लाऊन आमंत्रित्तताना देखील दिलासा देण्याची आता काळाची गरज असल्याचे लक्षात घ्यावे व कैलास महाजन यांनी अंमलात आणलेल्या वेळेवर लग्न लावण्याच्या पद्धतीचा आदर्श घ्यावा अशी चर्चा लग्न मंडपातून चर्चीली जात होती.