एरंडोल ब्लू बॉईज तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – एरंडोल येथील भीमनगर केवडीपुरा भागातील ब्लू बॉईज गृप तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात भीम गीत, देशभक्तीपर गीतांवर लहान मुले,तरुण व तरुणींनी नृत्य सादर केली.ॲड.ईश्वर बिऱ्हाडे व राणी बिऱ्हाडे यांच्या हस्ते सहभागी कलाकारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीस महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शालिग्राम गायकवाड, मिलिंद पवार,दशरथ महाजन, ॲड.ईश्वर बिऱ्हाडे, प्रमोद महाजन ,डॉ. नरेंद्र ठाकूर, आनंद दाभाडे, अमोल तंबोली, भारत बोरसे उपस्थित होते.कार्यक्रमाला उषा किरण खैरनार ,चिंतामण जाधव,प्रा. संदीप कोतकर, उमेश सूर्यवंशी, बाबुराव भगत, प्रा.उमेश गवई,प्रा. नरेंद्र तायडे,रवींद्र बोरसे, नितीन बोरसे, प्रकाश शिंदे, अनिल बोडरे, दिनेश बोरसे,सागर सरदार, संदीप बोडरे,सुभाष गायकवाड, प्रशांत इंगळे, जितेंद्र बोडरे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आकाश इंगळे, आदित्य बोरसे, तुषार सोनवणे, अमोल शिंदे, राज सरदार, अमोल बोरसे, रोहित गायकवाड, मयूर अहिरे, सुमित शिंदे, राजेश बोरसे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सागर बोरसे व अनिता बोरसे यांनी केले.