एरंडोल मतदार संघाला खर्च निरीक्षकांची भेट.
प्रतिनिधी – 16 एरंडोल मतदारसंघांमध्ये दि २०/४/२४ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निमित्ताने मुख्य खर्च निरीक्षक कुमार चंदन यांनी एरंडोल मतदारसंघांमध्ये भेट दिली यावेळी स्थिर सर्वेक्षण पथकाला भेट देऊन प्रत्यक्ष गाडी तपासणी केली.
त्याचबरोबर खर्च निरीक्षण पथक व इतर सर्व पथकांना भेटी देऊन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षाला भेट दिली.
याप्रसंगी सर्व पथकांच्या कामकाजांबाबत सूचना देण्यात आल्या. यावेळी सहाय्यक खर्च निरीक्षक विजयकुमार बोदाडे,प्रांताधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार एरंडोल सुचिता चव्हाण,तहसीलदार पारोळा उल्हास देवरे,गटविकास अधिकारी पारोळा शिंदे,ट्रेझरी अधिकारी व्हि.डी.पाटील, नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव ,दिलीप पाटील आदी उपस्थित होते.