राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रा.मनोज पाटील यांचा शेकडो समर्थकांसह
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
प्रतिनिधी – एरंडोल येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष
प्रा.मनोज पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक
बबलू चौधरी यांनी सुमारे पाचशे कार्यकर्त्यांसह बुलढाणा येथे मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे,पालकमंत्री गुलाबराव पाटील,खासदार प्रतापराव जाधव यांच्या
उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला
मोठा धक्का बसला आहे.यावेळी आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष
अमोल पाटील,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र
जाधव यांचेसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी प्रा.मनोज पाटील,बबलू चौधरी यांचेसह पदाधिका-यांचे शिवसेनेचा ध्वज
देवून स्वागत केले.तसेच प्रा.मनोज पाटील यांची युवासेनेच्या जिल्हाप्रमुख
पदी (पारोळा,एरंडोल,चोपडा,अमळनेर कार्यक्षेत्र) नियुक्ती करण्यात आल्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.शिवसेना प्रवेशावेळी प्रा.मनोज
पाटील व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.यावेळी शहरासह
ग्रामीण भागातील ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी देखील शिंदे गटात प्रवेश
केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.प्रा.मनोज पाटील यांनी
शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांनी
विशेष प्रयत्न केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यापासून प्रा.मनोज पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांपासून अलिप्त होते.प्रा.मनोज पाटील
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमांपासून अलिप्त राहत असल्यामुळे
त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.राष्ट्रवादी
कॉंग्रेसच्या अजित पवार गटातर्फे विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून
राजकीय वर्तुळात त्यांचेकडे पाहिले जात होते.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
तालुकाध्यक्ष असतांना त्यांनी शहरासह ग्रामीण भागात पक्षाचे संघटन मजबूत
केले होते.मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी
तालुकाध्यक्ष,माजी उपनगराध्यक्ष यासह विविध संस्थांवर प्रतिनिधित्व करीत
असलेले प्रा.मनोज पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार होते.मात्र
सद्यस्थितीत भाजपच्या पदाधिका-यांमध्ये अंतर्गत मतभेद वाढले असून पक्षात
दोन गट निर्माण झाले आहेत.भाजप पदाधिका-यांमध्ये असलेल्या अंतर्गत
मतभेदांमुळे प्रा.मनोज पाटील यांनी भाजप ऐवजी आमदार चिमणराव पाटील,जिल्हा
बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिंदे
गटात प्रवेश केला.यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे यांनी महत्वाची
भूमिका होती.प्रा.मनोज पाटील माजी उपनगराध्यक्ष असून त्यांच्या आई देखील
माजी नगरसेविका होत्या.पालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या
निवडणुकीत त्यांचा केवळ चारशे मतांनी पराभव झाला होता.तसेच त्यांच्या
नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वात जास्त नऊ नगरसेवक विजयी झाले
होते.प्रा.मनोज पाटील यांचेसह प्रवेश केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे
शहराध्यक्ष बबलू चौधरी देखील माजी नगरसेवक असून दोघेही प्रसिद्ध पहेलवान
असल्यामुळे युवकांचे मजबूत संघटन त्यांचेसोबत आहे.युवकांसाठी विविध
क्रीडास्पर्धांचे आयोजन करून त्यांना प्रोत्साहन धने,युवकांमध्ये
व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करणे आदी
उपक्रम त्यांनी सातत्याने राबवले आहेत.प्रा.मनोज पाटील,बबलू चौधरी
यांचेसह सुमारे पाचशे पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे आगामी
काळात होणा-या विधानसभा,नगरपालिका,जिल्हापरिषद आणि पंचायत समिती या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेस फायदा होण्यास मदत
होईल.आमदार चिमणराव पाटील,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकासकामांवर
प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचे प्रा.मनोज पाटील यांनी
सांगितले.दरम्यान प्रा.मनोज पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर
शहरातील त्यांच्या शेकडो समर्थकांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून
त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.प्रा.मनोज पाटील यांचेसह माजी नगरसेवक
बबलू चौधरी,उबाठा शिवसेनेचे शहर चिटणीस अतुल मराठे,भानुदास आरखे,बाळा
पहेलवान,अमोल तांबोळी,पंकज पाटील,आरिफ मिस्तरी,शाम जाधव यांचेसह पाचशे
युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी आमदार संजय गायकवाड,आमदार संजय
रायमुलकर,संपर्कप्रमुख विलास पारकर,जिल्हाप्रमुख वासुदेव
पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव,तालुका संघटक संभाजी पाटील,विधानसभा
क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे,युवासेनेचे तालुकाप्रमुख कमलेश पाटील,माजी
तालुकाप्रमुख बबलू पाटील,शहर संघटक मयूर महाजन,टोळीचे सरपंच बाळासाहेब
पाटील यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.