पुस्तक वाचल्याने शब्द संग्रह वाढतो – डॉ.विजय शास्त्री, फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिन साजरा.
प्रतिनिधी – पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे आहेत जसे आपला शब्दसंग्रह वाढतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व शास्त्री फार्मसी विद्यालयाचे अध्यक्ष डॉ.विजय शास्त्री यांनी केले.ते फार्मसी महाविद्यालयात जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली, आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व पुस्तक दिनाचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमास संस्थेच्या सचिव रूपा शास्त्री या उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे प्रा. मंगेश पाटील आणि समस्त प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले. जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले यांचे विशेष सहकार्य लाभले.