निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक निरीक्षक यांनी सुरक्षा कक्ष , मतदान केंद्रांस दिली भेट….!

InCollage_20240427_224441604.jpg

प्रतिनिधी – येथे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत ०३ – जळगांव लोकसभा मतदार संघातील ०१६ – एरंडोल विधानसभा मतदार संघास निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जळगांव लोकसभा मतदार संघांचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक मा. डॉ. राहुल गुप्ता, भा. प्र. से. यांनी आज दिनांक २७ एप्रिल  २०२५ रोजी  सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, एरंडोल यांच्या कार्यालयात १६ – एरंडोल विधानसभा मतदार संघातील सर्व क्षेत्रिय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीत निवडणूकी संदर्भात निवडणूक कामाचा आढावा घेवुन मार्गदर्शक सुचना दिल्या. तदनंतर डी. डी. एस. पी कॉलेज येथिल मतदान साहीत्य वाटप व स्विकृती केंद्रास भेट देवून पाहणी केली. तसेच सदर कॉलेज मधील स्थापीत केलेल्या सुरक्षा कक्ष (Strong Room) ची पुर्ण पाहणी केली व याच कॉलेजमधील चार मॉडल मतदान केंद्राची देखील पाहणी केली. त्यानंतर पहमालय येथिल मतदान केंद्र क्रं. १४१ (मुकपाट) या मतदान केंद्रास भेट देवुन केंद्रास वेब कॉस्टींग करण्याच्या सुचना दिल्या तसेच शहरातील आर. टी. काबरे हायस्कुल मधील स्थापीत आठ मतदान केंद्राची देखील पाहणी केली. तसेच उड्डाण पुलाखाली स्थापीत स्थिर सर्वेक्षण पथक (S.S.T.) या पथकास भेट देवुन रेकॉर्डची प्रत्यक्ष तपासणी केली. सदर भेटी दरम्यान मा. मनिषकुमार गायकवाड, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , सुचिता चव्हाण तहसिलदार , डॉ. उल्हास देवरे तहसिलदार पारोळा ,  डि. एस. भालेराव निवडणूक नायब तहसिलदार,  दिलीप पाटील निवासी नायब तहसिलदार, एरंडोल  विनोद पाटील लायझनिंग ऑफीसर, शिंदे गट विकास अधिकारी पारोळा हे अधिकारी उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!