सेवाव्रती आदर्श शिक्षक के.डब्ल्यू. चौधरी यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न.
प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे विद्यालयाचे ज्येष्ठ सेवाभावी शिक्षक के. डब्ल्यू. चौधरी यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ विद्यालय व आप्तेष्टांच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य आर.एस.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
नवलभाऊ प्रतिष्ठान नवलनगर संस्थेचे मानद संचालक प्रा. सुनिल गरुड हे होते.प्रमुखअतिथी म्हणून एरंडोल प. स. गटशिक्षणाधिकारी आदरणीय आर. डी. महाजन,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा नियोजन मंडळाचे सदस्य नानाभाऊ महाजन, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय डी.बी. पाटील,रवंजे विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन संतोष पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,पनवेल आर्मी स्कूलचे प्राचार्य एम.के मराठे,आर्मी स्कूल अंमळनेर प्राचार्य एस. यु. पाटील रोटवद माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व्ही.ए. सैंदाणे, पिंपळकोठा विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.जी.कोळी,संस्थेचे माजी मुख्याध्यापक हिम्मत पाटील, माळसेवगे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.सी.पाटील,एरंडोल वार्ताचे संपादक प्रा. शिवाजीराव अहिरराव, मुख्याध्यापक संघांचे तालुका अध्यक्ष प्रमोद चिलाणेकर,जळगाव माध्य. पतसंस्था संचालक भगतसिंग पाटील, जेष्ठ शिक्षक आर. झेड.पाटील,डॉ.डि.एस. महाजन,डॉ.नलिन महाजन , रवंजे बु.गावाचे लोकनियुक्त सरपंच नामदेव माळी, रवंजे खु. गावाच्या लोकनियुक्त सरपंच सुरेखा चौधरी, रवंजे गावाच्या पोलीस पाटील शरयू चौधरी, रवंजे खु.पोलीस पाटील किरण खामकर,मा. सरपंच लालचंद कोळी,मा.सरपंच गोकुळ देशमुख इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर अतिथींचा सत्कार विद्यालयाच्या व चौधरी परिवाराच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तसेच सत्कारमूर्ती के.डब्ल्यू. चौधरी यांचा सेवापुर्ती निमित्त सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सहपत्नीक सत्कार विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य आर. एस सानप यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल वाघ,एन. वाय पाटील,पी.बी.पाटील यांनी केले. तर आभार प्रज्ञा चौधरी यांनी मानले.
सेवापुर्ती सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.