एरंडोल मतदार संघात गृह मतदानाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांची भेट.
प्रतिनिधी – १६ एरंडोल विधानसभा मतदारसंघांमध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दिनांक ४ मे रोजी गृह मतदान घेण्यात आले.या गृह मतदानाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट दिली.त्याचबरोबर एरंडोल स्ट्रॉंग रूम व मतदार चिठ्ठी वाटप कार्यक्रमास देखील भेट दिली.यावेळी त्यांनी आवश्यक सूचना संबंधितांना केल्या.
याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीष गायकवाड,तहसीलदार एरंडोल सुचिता चव्हाण, तहसीलदार पारोळा उल्हास देवरे, गृह मतदानाची टीम ,नायब तहसीलदार व महसूल कर्मचारी उपस्थित होते.