माहितीच्या अधिकाराखाली तालुक्याचे मा. आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी मिळवलेल्या माहिती नुसार.
प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील पिण्याचे पाणी व शेती सिंचनासाठी लाईफ लाईन असलेल्या अंजनी मध्यम प्रकल्पाचे दुसऱ्या टप्प्याचे वाढीव उंचीचे गेल्या अनेक वर्षापासून केवळ राजकिय इच्छा शक्तीच्या अभावामुळे पुर्ण झालेले नाही त्यामुळे धरणगांव तालुक्यातील अंजनी लाभ शेत्रातील जवळपास १९ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न अद्याप पर्यंत मार्गी लागला नाही तसेच पद्मालय क्रमांक २ प्रकल्पाचे काम देखील रखडल्यामुळे एरंडोल धरणगांव तालुक्यातील पुर्व भागातील अनेक गावे सिंचनपासून वंचित राहिले आहे या अपुर्ण कामाना कधी चालना मिळेल लाभ शेत्रतील गावांची शेत जमिन ओलीताखाली येण्यासाठी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार असे प्रश्न जनतेमधून उपस्तीत केले जात आहे सध्या लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचारात होत असलेल्या आरोप प्रत्त्यारोपा पेक्षा उमेदवारांनी रखडलेले सिंचन प्रकल्पाना मार्गी लावण्यासाठी जनतेला अश्वासित करावे अशी अपेक्षा मतदार राजाकडून केली जात आहे
तालुक्याचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनी या बाबत माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहिती नुसार अंजनी धरणाच्या वाढीव उंची नुसार दुसऱ्या टप्प्याचे काम पुर्ण झाल्यावर एकुण ४६२४ हेक्टर शेत्तराला सिंचन लाभ होणार आहे विशेष हे की धरणगांव तालुक्यातील ३०२९ हेक्टर व एरंडोल तालुक्यातील १५९५ हेक्टर या प्रमाणे शेत जमिन भिजणार आहे सद्य स्थितित धरणगांव तालुक्याला ७०६३ हेक्टर व एरंडोल तालुक्याला २०६८ हेक्टर या प्रमाणे एकुण २८३१ हेक्टर एवढ्याच क्षेत्राला लाभ होणार आहे मात्र बंदिस्त पाईप लाईनच्या वितरण प्रणालीचे कामे न झाल्यामुळे पुर्ण क्षमतेने सिंचन लाभ होत नाही
वाढीव उंचीचे काम न झाल्यामुळे धरणगांव तालुक्यातील बोरगांव बुद्रुक बोरगांव खुर्द बाभोरी बुद्रुक ही डाव्या कालव्याच्या लाभ शेत्ररातील गांवे अजूनही सिंचनपासून वंचित आहेत तर अशीच स्थिती उजव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील धरणगांव तालुक्यातील बाभोरी बुद्रुक हिंगोने बुद्रुक कल्याणे खुर्द भोद बुद्रुक पिंप्री खुर्द वाघळुद पिंपळेसिम खपाट सतखेडा झुरखेडे अंजनविहिरे वाकटुकी सोनवद बुद्रुक आहिरे बुद्रुक चामगांव बाभुळगाव या अंजनी थडी व गुजर थडी या गावांची शेतजमिन अंजनीच्या पाण्याने भिजली नाही
पद्मालय क्रमांक २ प्रकल्पामुळे धरणगांव तालुक्यातील ५४६७ हेक्टर शेत्ररला सिंचनाचा लाभ होणार आहे या प्रकल्पामुळे एरंडोल तालुक्यापेक्षा धरणगांव तालुक्याचे अधिक शेत्र भिजणार आहे धरणगांव तालुक्यातील टाकळी बु. टाकळी खु. पाळधी बु. पाळधी खु.र्भोकणी, वंजारी ,बांभोरी, आव्हानी, एकलग्न, लाडली पथराड खु, पथराड बु, शेरी ,धार, दोंनगाव फुलपाट, चांदसर या प्रमाणे १७ गावांचा समावेश आहे