बहिणी सोबत प्रेम विवाह केल्यामुळे युवकाला मारहाण.

images-5.jpeg


प्रतिनिधी – एरंडोल येथील युवकाने एरंडोल येथील युवती सोबत प्रेम विवाह केल्याने त्याचा राग येऊन मुलीच्या भावाने,बहिणीने व अन्य लोकांनी युवकाला व युवतीला जबर मारहाण करुन जिवेठार मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला युवकाने दिली असून एकुण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरुन मिळालेली माहिती अशी की एरंडोल येथील कल्पेश रवींद्र पाटील वय २४ या युवकाने गावातील अमळनेर दरवाजा भागातील मुलीसोबत प्रेम विवाह केला.या गोष्टीचा मनात राग असल्याने मुलीचा भाऊ जितेंद्र धनराज ठाकुर रा.अमळनेर दरवाजा हा मनात राग धरुन काहीपण कुरापती काढत असे. दि.१३ मे रोजी सायकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कल्पेश भोई गल्ली येथील घरी जात असताना  जितेद्र धनराज ठाकुर , जागृती धनराज ठाकुर , हर्षदा अविनाश ठाकुर हे आले यावेळी जितेंद्र धनराज ठाकुर याने कल्पेश यास जाब विचारत म्हणाला की माझ्या बहिणीशी प्रेमविवाह का केला ? व असे बोलुन त्याने लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली व जितेंद्र धनराज ठाकुर याने त्याच्या हातातील लोखंडी फायटर ने कल्पेशच्या उजव्या हातावर व डोक्यावर मारहाण करुन दुखपात केली व जागृती ठाकुर व हर्षदा ठाकुर यांनी देखील चापट्टाबुक्क्यानी मारहाण करुन शिवीगाळ केली.याप्रसंगी गल्लीतील लोकानी सदर भांडण सोडवले परंतु जितेंद्र धनराज ठाकुर याने कल्पेश यास मी तुला जिवंत सोडणार नाही असे धमकावले.त्यानंतर त्यांनी घरात घुसुन कल्पेशची पत्नी  हीला जितेद्र धनराज ठाकुर , जागृती धनराज ठाकुर , हर्षदा अविनाश ठाकुर , कविता अविनाश ठाकुर , साधना धनराज ठाकुर व अन्य लोकांनी  घरात घुसुन मारहाण केली व घराच्या बाहेर काढुन लाथा बुक्क्यांनी मारहान करुन शिवीगाळ करत तुम्हाला दोघींना जिवंत सोडणार अशी धमकी दिली  असल्याची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला कल्पेश याने दिली. कल्पेश यास दुखापत झाली असल्याने त्यास एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविले परंतु त्यास जास्तीच्या उपचाराची गरज असल्याने जळगाव येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
     याबाबत  एरंडोल पो.स्टे. ला जितेंद्र धनराज ठाकुर , जागृती धनराज ठाकुर , हर्षदा अविनाश ठाकुर , कविता अविनाश ठाकुर , साधना धनराज ठाकुर सर्व रा. अमळनेर दरवाज एरंडोल यांच्या विरुध्द भा.द.वि कलम १४३ , १४७ , ८२४ ,४५२ , ५०४ , ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संतोष चौधरी हे करीत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!