शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मंगळ ग्रह मंदीराचा उपक्रम स्तुत्य – अशोक जैन
जैन हिल्स येथून शेतकरी जनजागृती रथ उपक्रमास आरंभ
अमळनेर प्रतिनिधी – शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे यासाठी शेतकऱ्यांसाठी जनजागृती रथ हा अमळनेरच्या मंगळ ग्रह मंदीर संस्थान तर्फे उपक्रम स्तुत्य आहे या उपक्रमासाठी मी जैन इरिगेशनच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले. मंगळ ग्रह सेवा संस्था, व तालुका कृषि कार्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळ कृषी जनजागृती रथ यात्रेचे उद्घाटन आज जैन हिल्स येथे कृषि पर्यटन दिनाचे औचित्य साधून जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुरबार तडवी यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. मंगळ ग्रह मंदीर संस्थानच्या वतीने गत पाच वर्षांपासून कृषी क्षेत्र जागर रथाचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी मंगळ ग्रह मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ.डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, विनोद कदम, अभियंता संजय पाटील, जी. एस. चौधरी, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, आर. टी. पाटील, एम. जी. पाटील, ए. डी. भदाणे, सुनील गोसावी, निलेश महाजन, रवींद्र बोरसे, विशाल शर्मा, आशिष चौधरी, जे. व्ही. बाविस्कर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी उपक्रमाचे महत्त्व विषद केले, तर मंगळ ग्रह मंदिराचे पुरोहीत प्रसाद भंडारी यांनी रथाचे विधीवत पूजन केले.
शेतकऱ्यांच्या जनजागृती रथ उपक्रमांतर्गत अमळनेर तालुक्यातील १५४ गावांसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचे कारण म्हणजे खरीप हंगाम २०२४ पूर्वी शेतकऱ्यांकडून शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठा खरेदी केल्या जातात. त्यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यांची फसवणूक टळावी, जागृती यावी, यासाठी त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबची शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध, वास्तव माहिती प्राप्त होणार आहे.
कोट
‘भारतातील ऐतिहासिक अशा देवभूमी अमळनेर येथे मंगळ ग्रहाचे मंदीर आहे. त्या मंदीरा मार्फत निरनिराळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलं जातं. धर्म-ज्ञान हे तर त्यांचं क्षेत्रच आहे. ते त्यांचे प्राथमिक, मुख्य काम असले तरी समाजातील वेगवेगळ्या वर्गाला जन जागृतीच्या माध्यमातून ते त्यांच्या प्रश्नांना हात घालायचा प्रयत्न करतात. थेट लोकांपर्यंत जनजागृती भिडते, त्यातून एक चांगला संदेश पोहोचतो व त्यानुसार लोक मार्गक्रमण करत असतात. त्याच कडीमध्ये आपल्या मंगळ ग्रह मंदिराच्या मार्फत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी रथ काढतात. त्या रथ यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो. शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामकाजात या ज्ञानाचा वापर करतात. जेणे करून त्यांचे नुकसान होणार नाही व उत्पादनही वाढेल. या उपक्रमात अमळनेर कृषि विभागानेही मोलाची साथ दिलेली आहे. या उपक्रमास शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षापासून या सोबत शेती आणि शेतकरी तसेच जैन इरिगेशन हे जे अतूट नाते आहे या उपक्रमात जैन इरिगेशनलाही सोबत घ्यावे. या शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती व उच्च तंत्रज्ञान ही पोहोचवू. जेणे करून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण होईल. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हेच माझ्यासाठी मोठे पारितोषिक असे जैन इरिगेशनचे संस्थापक आमचे वडील भंवरलालजी जैन म्हणत असत. सर्व मिळून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून या…’
अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन जळगाव.