मतदान जनजागृती केल्याबद्दल कासोदा येथील मधूकर ठाकूर यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान…..!
एरंडोल प्रतिनिधी – कासोदा येथील मधूकर ठाकूर स्व:खर्चाने सायकल वर फिरुन मतदान ची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान जनजागृती केल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते सत्कार व गौरव करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी मधुकर ठाकूर यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी आनंदी आहे . कासोदा येथे मधूकर ठाकूर यांच्या सायकलवर फेरफटका मारल्याची आठवण सुद्धा मनोगत व्यक्त करताना केली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद समवेत कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.