अँग्लो उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोफत सायकली वाटप
एरंडोल – येथील अँग्लो उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे मानव विकास योजना 2023-24 अंतर्गत इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणार्या 159 मुलींना नुकतेच मोफत सायकलींचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक़्रमास प्राचार्य शेख सलीम शेख मोहम्मद आणि अंजुमन ए इस्लाम ट्रस्ट चे अध्यक्ष जहिरोद्दीन शेख कासम, उपाध्यक्ष सैय्यद जाकीर हुसैन साबीर अली, सचिव शेख शकीलोद्दीन जमीलोद्दीन, जॉ. सेक्रेटरी अकील शेख जहिरोद्दीन, कोषाध्यक्ष रहीम शेख शफी, सभासद एजाज अहमद हाजी जुगन साहब, शेख हुसेन शेख ईसा, खालिद अहेमद रजीयोद्दीन शेख, सैय्यद कमर अली शौकत अली, यासिन खान करीम खान, लतीफ शेख अब्दुल, साबिर शब्बीर मुजावर, शकील शेख नबी बागवान उपस्थित होते. सुत्रसंचलन अमजद शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य शेख सलीम शेख मोहम्मद यांचेसह शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद अमजद सर, युसूफ सर, मुख्तार सर, इरफान सर, सैय्यद इमरान सर, फ़िरदौस मॅडम, अल्तमश सर, अज़हरोद्दीन सर, जुबेर सर, मुदस्सर सर, माहेनाज मॅडम, नदीम सर, वाजिद सर, फराज़ सर, एजाज़ शेख, युसूफ शेख, जावेद अहमद, अश्फाक बागवान आदींनी परीश्रम घेतले.