आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल आंतरराष्टीय हुनररत्न अवॉर्ड 2024 प्रदान

IMG-20240531-WA0089.jpg

विशेष प्रतिनिधी – जितेंद्र केवलसिंग पाटील ( अध्यक्ष – आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन ) यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल आंतरराष्टीय हुनररत्न अवॉर्ड 2024 प्रदान करण्यात आला.

          सदर कार्यक्रम हूनर बिझनेस नेटवर्क ब्रँड अँबेसेडर आसिफ नूर हसन आणि शगुप्ता मुमताज यांच्या पुढाकाराने ठेवण्यात आला होता.

  आपण समाजाचे आणि राष्ट्राचे एक जबाबदार घटक असुन समाज ऋण व राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे, अशा भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या.सामाजिक क्षेत्रातील अतिशय उत्तम अशा कामगिरीसाठी व सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून जनसेवा हीच ईश्वरसेवा याचे समाजासमोर मुर्तिमंत उदाहरण असल्याचे आपल्या कार्याने दाखवुन दिल्याने सदर पुरस्कारासाठी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींकडुंन जितेंद्र पाटील यांचे नाव सुचविण्यात आले होते.

कोरोनाव्हायरस सारख्या संसर्ग आजारामुळे जनता भयभीत झालेले असतांना अशा संकटसमयी मोफत जेवण उपलब्ध करून देणे, धान्य, शिधा व गरजेच्या वस्तु मोफत वाटप करणे, रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे, मुंबईतील नामांकित व खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांचे मोफत उपचार करून देणे. अतिशय अल्प दरात रुग्णवाहिका सेवा ऊपलब्ध करून देणे, अनाथ आश्रमामधिल मुलांना
दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण पुरविणे, अपंगांना
जयपूर फूट, कॅलिपर सायकल वाटप करणे.  यासारख्या विविध उल्लेखनीय कामगिरीसाठी जितेंद्र पाटील यांना आत्तापर्यंत ४ आंतरराष्ट्रीय आणि १५० राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहे.

सदर पुरस्कार जितेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आल्याने उत्तम कार्य करणाऱ्या व योग्य व्यक्तीला देण्यात आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!