पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती एरंडोल येथे उत्साहात साजरी…..
राजयोगिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 299 वी जयंती मोठ्या उत्साह पुर्ण वातावरणात मौर्य क्रांती
एरंडोल करांनी साजरी केली.
एरंडोल येथील धरणगाव चौफुली पुलाखाली भव्य पटांगणात उंच असे राजगृह उभारून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन विविध मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रातील लोकांनी ,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांनी अभिवादन केले अहिल्यादेवी होळकर यांच्या समोर ते नतमस्तक झाले. हा एक उत्तम व समाज जागृतीचा उपक्रम असल्याची भावना या प्रसंगी व्यक्त झाली. अहिल्यादेवी यांनी आपले जीवन लोकहिताच्या साठी समर्पित कसे केले या बाबत मान्यवरांनी भावना व्यक्त केली.
या प्रसंगी अमित दादा पाटील, अभिजीत पाटील, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी राव अहिरराव, प्रा.आर एस पाटील, प्रा.आर ए पाटील सर,तालुका वैद्यकीय अधिकारी डाक्टर अक्षय कुमार लाळगे, सामाजिक कार्यकर्ते सौ.निर्मला लाळगे शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुका अध्यक्ष जाधव,विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदिश पाटील, मुख्याध्यापक संघ पदाधिकारी राजेंद्र पाटील, शालिकभाऊ गायकवाड, प्रा. गायकवाड सर,शिवसेना नेते दशरथ भाऊ महाजन,माजी नगराध्यक्ष रमेश भाऊ परदेशी, प्रा.मनोज पाटील, कवी वा.ना.आंधळे, नामदेवराव पाटील, रघुनाथ कोठावदे ,ग स.संचालक भाईदास पाटील, हिंमतराव पाटील, तुकाराम आबा पाटील, नाना पाटील सर, पारोळा सोसायटी संचालक नाना साळुंखे व तुकाराम पाटील, पुजारी गोरे भाऊसाहेब, एरंडोल पी आय गोराडे साहेब या सह विविध नागरिकांनी सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाचे आयोजन मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लाळगे नाना, उपाध्यक्ष निळे सर,तालुका अध्यक्ष सुरेश पारखे, कार्याध्यक्ष कृष्णा धनगर, उपाध्यक्ष मनोरे सर व मौर्य क्रांती संघटना पदाधिकारी यांनी केले होते.