एरंडोल येथे नॅशनल हायवेवर एक लाख रु. जबरीने हिसकावून आरोपी फरार.
प्रतिनिधी – एरंडोल येथे दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी एक वाजता पद्मालय गॅस एजन्सी समोर राष्ट्रीय महामार्गावर डिव्हायडर जवळ दोन अनोळखी बिना नंबरची मोटरसायकल वर येऊन फिर्यादी जवळील पांढऱ्या रंगाच्या पिशवीतील एक लाख रुपये जबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली होती.
याबाबत पद्मालय इजेन्सी चे कॅशियर राजेंद्र उत्तम पाटील राहणार खडके सिम तालुका एरंडोल धंदा नोकरी यांनी फिर्याद दिली की ते एरंडोल शहरातील पद्मालय गॅस एजन्सी समोर राष्ट्रीय महामार्ग ६ वरुन जात असताना दोन अज्ञात चोरटे मोटरसायकलने आले व हातातील बॅग जबरीने हिसकावून नेले.त्यास त्यांनी विरोध केला असता मागील चोरट्याने चाकूचा धाक दाखवून दुखापत करण्याची धमकी दिली.म्हणून त्या अज्ञात इसमा विरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्यादी यावरून भा द वि कलम ३९४,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे त्यांचे सहकारी तपास करीत आहे .